वंचीत बहुजन आघाडी बुलडाणा जिल्ह्यात आगामी सर्व निवडणुका ताकदीनिशी लढणार !
जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांची मलकापूर येथे कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा
बुलढाणा (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका सर्व ताकदीनिशी लढवणार आहे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी मजबूत करतांना वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठीही काम केले पाहिजे, यापुढे पक्षात निष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्यात येईल अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी मलकापूर येथे कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी केली,
वंचित बहुजन आघाडी बुलडाणा (उत्तर) जिल्ह्याच्या वतीने आढावा बैठक व “भव्य जिल्हा कार्यकर्ता मेळावा” 11 फेब्रुवारी रोजी महेश भवन, मलकापूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा जी. प.सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भोजने हे होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून महीला जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंग, जेष्ठ नेते डॉ. राजकुमार सोनेकर, विद्वत सभेचे समन्वयक डॉ. आर.डी.इंगोले, जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, ऍड.अनिल ईखारे, नगरसेविका प्रीतीताई शेगोकार यांची उपस्थिती होती तसेच जी.उपाध्यक्ष विजय तायडे, भगवान इंगळे, ऍड. सदानंद ब्राम्हणे, अताउल्ला खान, मायाताई दामोदर, पार्वताताई इंगळे, सुमनताई थाटे, जी. सचिव श्रीकृष्ण इंगळे, जी.संघटक भाऊराव उमाळे, वसंतराव तायडे, अनिल पाचपोळ, भगवान वाकोडे, अरुण पारवे, वाकोडे, संघपाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मलकापूर तालुका व शहरातील मुस्लिम व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केला.
या मेळाव्यात जी. परिषद.पंचायत समिती,bनगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवार चाचपणी करणेबाबत, गाव तेथे ग्राम शाखा गठित करणे, बूथ कमिटी गठित करणे, पक्षाची सदस्य नोंदणी अभियान राबविणे आदी विषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले तथा जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांकडून सर्कल निहाय बांधणीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष सुशील मोरे मलकापूर, संतोष गवई जळगाव जा., अजाबराव वाघोदे नांदुरा, ता. महासचिव नरसिंग पारधी, विजय सातव, मधुकर तायडे, शेगाव अध्यक्ष राजेंद्र शेगोकार,मलकापूर अध्यक्ष विलास गुरव, अलमनुरबी, अतुल पाचपोळ, सुनील बोदडे, विद्वत सभेचे तुकाराम रोकडे, खामगावचे मिलिंद हिवराळे,गौतम सुरवाडे, श्रीकृष्ण गवई, संजय दाभाडे, राजूभाऊ शेगोकार, एम. ओ.सरकटे, यासीन कुरेशी, गणेश सावळे, गजानन झनके, विलास तायडे, विनोद निकम, दिलीप वाघ, सतीष काजळे, अजाबराव वानखेडे, मधुकर निकम, हरीचंद्र गुरचळ, सुपडा ब्राह्मणे, भिमराज मोरे, सिद्धार्थ मोरे, सम्राट उमाळे, रत्नदीप ससाणे, प्रसन्ना कोलते, सैय्यद साजिक यांचेसह आजी माजी पुरुष व महिला पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर मेळावा मलकापूर तालुका व जिल्हा पदाधिकारी,सर्कल मधील सर्व कार्यकर्ता टीमने सहकार्य करून अगदी भव्य प्रमाणात व शिस्तबद्धरित्या यशस्वी केला. सूत्रसंचालन तालुका जी.संघटक भाऊराव उमाळे यांनी तर आभार प्रदर्शन ऍड.सदानंद ब्राह्मणे यांनी केले.