दिनांक- १६ जुलै२०२२
प्रतिनिधी गहिनीनाथ वाघ
दि.१४ रोजी वैजापुर तालुक्यातील टेंभी गावामध्ये होतोय बोगस कामांचा सुळसुळाट नागरिकांनी विचारपूस केली असता ग्रामसेवक तुषार माडवळे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली तसेच दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच सदस्य यांच्यासमोर माहिती देण्यात यावी या रोड साठी एकूण चार लाख रुपये मंजूर असून प्रशासकीय मान्यता ग्रामपंचायत मध्ये नाही.इस्टिमेट पण नाही असे ग्रामसेवक सांगतात प्रोसिडिंग कधी लिहिले सांगता येत नाही व कोऱ्या प्रोसिडिंग वर सया मागतात व ग्रामसेवक ला विचारले तर माहिती देत नाही धमकी देतात की तुमच्यावर ३५३ दाखल करीन व ग्रामपंचायत मध्ये येत नाही उपसरपंच टेंभी आशाबाई राजेंद्र पवार या महिला असल्याकारणाने मुद्दामून मानसिक त्रास देतात असे गावातील नागरिक उपसरपंच बोललेत आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पंचायत समिती वैजापूर समोर उपोषण करू असेही बोललेत.