महाराष्ट्रराजकीय
जयंत पाटील यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांची चर्चा
अलिबाग (वृत्तसंस्था) शेतकरी भवन अलिबाग येथे शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांची चर्चा करण्यात आली.
ओबीसींच्या विविध समस्या व त्याच्यावर होणार अन्याय व पुढील चळवळीची दिशा कशी असावी. यावर तब्बल सकाळी 9 ते दुपारी 2 अशी मॅरेथॉन चर्चेसाठी विस्तृत वेळ जयंत पाटील यांनी दिला व सर्व मुद्द्यावर वेळोवेळी विधिमंडळात मांडण्यात येईल असे सांगितले.
तसेच माजी आमदार दिगंबर विशे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश भांगरथ यांनी माझं ओबीसीच्या विविध विषयांवर प्रेझेन्टेशन या मिटींगमध्ये आयोजित केले होते. जयंत पाटिल साहेबांनी सर्व मुद्दे विस्तृतपणे एकूण घेऊन प्रेझेंटेशनचे विशेष कौतुक केले. तसेच रायगडाच्या पायथ्याशी ओबीसींचा विशाल संमेलन घेण्याचे प्रयोजन करायचं अस एकमत झाले आहे.