महाराष्ट्र
रेल्वे क्रॉसिंगवरील विचित्र अपघात
धुळे : शहरातील आग्रा रोडवरील रेल्वे क्रॉसिंगनजीक दोन बस आणि कारचा विचित्र अपघात झाला. त्यात सुदैवाने कोणा ला मोठी इजा झाली नाही. मात्र वाहनांचे नुकसान झाले आहेत. तर अपघातानंतर वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती.
शहादा- औरंगाबाद सेंट एसटी बस (S.m. h. 20 बीएल 24 95) वरील चालक रेल्वे क्रॉसिंगवर वळण घेत असतांना या बसच्या मागून अल्टो कार (क्र. एम एच ४१ जी ९७०८) येत होती. तर कारमागून येणा-या धुळे – निमगुल बस (क्रमांक 40 एन ९०८५) वरील चालकाने पुढील कारल धडक दिली. त्यामुळे अल्टो कार पुढच्या एसटीला जाऊन धडकली.
सुदैवाने तिघाही वाहनांचा वेग कमी असल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. त्यानंतर वाहन चालकांच वादही झाला. परिणामी प्रवाशांना काही काळ ताटकळत उभे रहावे लागले. अपघाता बाबत शहर पोलिसात कळविण्यात आले.