डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भाजपतर्फे उत्साहात साजरी
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, युगपुरुष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने माजी पालकमंत्री आमदार संजय सावकारे, शहराध्यक्ष परिक्षित बर्हाटे,माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष राहुल तायडे यांचे हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन करून जोरदार घोषणा करण्यात आल्या. त्याचप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना लाडू वाटपही करण्यात आले.
यावेळी जिल्हा चिटणीस शैलेजाताई पाटील, शहर सरचिटणीस संदिप सुरवाडे, राजु खरारे, शंकर शेळके, अलकाताई शेळके,अर्जुन खरारे, महिला मोर्चा अध्यक्षा अनिता आंबेकर, मंगेश पाटील, वेदप्रकाश ओझा, कैलास शेलोडे, धनराज बाविस्कर,अनिल पाटील,रहेमान शेख, संतोष ठोकळ, सुरेश जोहरे, विक्की गोहर,कमलाकर अडकमोल, युवा मोर्चाचे अनिरुद्ध कुळकर्णी,श्रेयस इंगळे, लोकेश जोशी, चेतन सावकारे, चेतन बोरोले, गोपिसिंग राजपुत, नागेश खरारे, तुषार कुरकुरे आदींची उपस्थिती होती.