बनावट लसीकरण प्रमाणपत्र प्रकरण ; नगरसेवक बरिंची पोलीस कोठडीत रवानगी
धुळे (विक्की आहिरे) बनावट लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणात पोलिसांना शरण आलेले नगरसेवक वसीम बारी यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने सोमवारी हे निर्देश दिले.
या प्रकरणात आणखी एका संशयिताचे नाव पुढे आले आहे. कोरोना प्रतिबंधित लसीकरण मोहीम महापालिकेकडून राबवली जाते आहे. त्यासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी मोहाडी येथील लसीकरण केंद्रात सुमारे तीन हजार १९१ जणांचे बनावट लसीकरण झाल्याचे समोर आले. याप्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक झाली आहे. संशयितांनी दिलेल्या माहितीवरून नगरसेवक वसीम बारी यांचे नाव समोर आले होते. बारी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर ११ दिवसांनी म्हणजे रविवारी सायंकाळी ते पोलिसांना शरण आले. त्यांना सोमवारी न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने नगरसेवक वसीम बारी यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आणखी एका संशयिताचे नाव मोर आले आहे. धुळे शहर पोलीस पथक त्याच्या मागावर आहे. नाव समोर आलेल्या संशयिताने अनेक नागरिकांच्या आधारकार्डच्या प्रतीवरून बनावट लसीकरण केले असल्याचे तपासातून पुढे आले आहे. त्याच्या शोधासाठी काही निकटवर्तीयांकडे चौकशी सुरू आहे.