धरणगाव येथील बालिकांवर अत्याचार प्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी ; प्रदेश तेली महासंघाचे आंदोलन
चोपडा (विश्वास वाडे) धरणगाव येथे सहा व आठ वर्षाच्या बालिकांवर चंदुलाल शिवराम मराठे नामक नराधमाने अत्याचार केला. त्या अत्याचारी नराधमांचा निषेध करण्यासाठी प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा तसेच चोपडा तालुक्याच्या वतीने समस्त तेली समाजातर्फे पिडीत कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले.
चोपडा तहसील कार्यालयासमोर 23 फेब्रुवारी रोजी केलेल्या आंदोलनात अति जलद गती न्यायालयात सदरचा खटला चालवण्यात यावा व अत्याचारी नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागण्यांसह पिडीत कुटुंबाला संरक्षण द्यावे, दोन्ही बालकांचा भविष्यातील शिक्षणाचा खर्च शाशनाने करावा, भविष्यात दोन्ही बालकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, तसेच प्रत्येक बालिकेच्या नावावर प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली. अशाच प्रकारच्या जोरदार घोषणा देऊन नराधमाचा निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार अनिल कुमार गावित यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष के. डी .चौधरी, चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी, चोपडा तालुका महिला अध्यक्षा सौ० सीमा सुनील चौधरी, उपाध्यक्षा सौ० योगिता शशिकांत चौधरी, चोपडा तेली समाजाचे उपाध्यक्ष टी. एम. चौधरी, विश्वस्त नारायण चौधरी, देवकांत चौधरी, सुनील चौधरी, अनिल चौधरी, प्रकाश चौधरी, आबा चौधरी, राजू चौधरी, गोपीचंद चौधरी, सुनील चौधरी अनेक समाज बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी तहसीलदार गावित यांनी वरिष्ठांकडे मागण्यांचे निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे नमूद केले.