चोपडा येथे भारतीय जनता पार्टी व ओबीसी मोर्च्याच्या वतीने साखळी आंदोलन
चोपडा (विश्वास वाडे) दि. ५ जानेवारी २०२२ ला आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौऱ्यावर असताना, पंजाब येथील काँग्रेस सरकारने पंतप्रधान यांच्या सुरक्षेत केलेली त्रुटीपूर्ण कुचराई व कट कारस्थान रचुन केलेल्या चुकीमुळे भारताच्या पंतप्रधानांचे प्राण धोक्यात आले होते.पंरतु परमेश्वरच्या कृपेने, व आपल्या देशातील संरक्षण यंत्रणेच्या तत्परतेने आणी भारतीय जनतेच्या आशीर्वादामुळे, नरेंद्र मोदी त्या संकटातुन बचावले.
पंजाब मधील काॅग्रेस सरकारने निकृष्ठ मानसीकतेच प्रदर्शनातुन, हेतुपुरस्सरपणे घडविलेल्या घटनेचा निषेध म्हणुन, आज रोजी भारतीय जनता पार्टी चोपडा ओबीसी मोर्च्याच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. के.लक्ष्मण व प्रदेश अध्यक्ष योगेश अण्णा टिलेकर व आमचे जिल्हा अध्यक्ष राजु मामा भोळे यांच्या निर्देशावरुन सर्व जिल्हा व मंडल स्तरावर सदर घटनेचा निषेध व “मानव साखळी” आंदोलन करण्यात आले.
मानव साखळी” आंदोलनाचे आयोजन ‘काळे मास्क’ वा काळा कापड तोंडावर बांधुण, तसेच गळ्यात भाजपा दुप्पटा घालुन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्थानिक भाजपा पदाधिकारी पंकज पाटील, तालुका अध्यक्ष गजेंद्र जेसवाल, शहर अध्यक्ष कांतिलाल पाटील, ओबीसी तालुका अध्यक्ष सुरेश चौधरी, प्रकाश पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष रवींद्र मराठे, शहरध्यक्ष मनोहर बडगुजर, सरचीटणीस हेमंत जोहरी, सुनिल सोनगेरे, विजय बाविस्कर, तालुकासंपर्क प्रमुख सागर चौधरी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष गोपाल पाटील, कैलास पाटील व इतर सर्व कार्यकर्ते, व सदर आंदोलन सर्वांच्या सहकार्याने करण्यात आले.