पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेडच्या वतीने जेकीकोरे यांना विशेष प्रशस्तीपत्र
देगलुर (प्रतिनिधी) मारोती हनेगावे पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड च्या वतीने देगलूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बसवेश्वर रामचंद्र जेकीकोरे यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल कलम 394, 341, 34, आय,पी,सी, या गुन्ह्यात अत्यंत संवेदनशील पद्धतीने गुन्हा हाताळून गुन्हेगारांना सदर गुन्ह्यात आपण आपले कौशल्य वापरून आरोप निष्पन्न करून अटक करण्यास मदत केली ह्या आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपले विशेष कौतुक करण्यात येत असून या बाबत आपणास पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड च्या वतीने विशेष सन्मानित प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
आपण भविष्यात तसेच उत्कृष्ट कर्तव्य बजावून महाराष्ट्र पोलीस दलांच्या परंपरेत भर टाकाल अशी अपेक्षा नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयाचे अधीक्षक प्रमोदजी शेवाळे साहेब यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. त्याबद्दल पोलीस स्टेशन देगलूर चे नाव नांदेड जिल्ह्यात चर्चेत आले असून विशेष करून शहापूर सर्कल मधील सर्वसामान्यांमध्ये आपल्याबद्दल अभिमानाने सर्वसामान्यांची मान अभिमानाने उंचावली आहे. आपल्या या कामगिरीबद्दल गुन्हेगारी प्रवृत्तीने वागणार्यायांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे व निजाम काळापासून पोलिस दलाबद्दल सर्वसामान्यांमध्ये असलेले भीतीचे वातावरण निश्चितपणे कमी झाले आहे. असेच कार्य आपल्या हातून घडावे व महाराष्ट्र पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली जावे ही अपेक्षा देगलूर कराकडून व्यक्त केली जात आहे.