डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे लवकरच लोकार्पण ; नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांची ऐतिहासिक कामगिरी
स्पर्धा परीक्षार्थींसाठी अत्यंत उपयोगी
देगलूर (प्रतिनिधी) देगलूर नगरपरिषदेच्या वतीने शहरांमध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उभारण्यात आले असून याचे सर्व श्रेय नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांना जाते . या अभ्यासिकेमुळे देगलूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल असे शैक्षणिक वातावरण निर्माण होऊन येणारी पिढी ही भविष्यातील मोठमोठी अधिकारी बनतील व जीवनात यशस्वी होतील . त्या मूळे शहरातील सर्व विद्यार्थ्यासाठी हि अभ्यासिका एक महत्वाचे स्फूर्तीस्थळ होणार आहे.
देगलूर नगर परिषदेच्यावतीने जुनी नगरपालिका येथील व्यापारी संकुलच्या वर डॉ . बाबासाहेब आंबेडकर अद्ययावत अभ्यासिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे .या अभ्यासिकेत मध्ये एकूण दीडशे विद्यार्थी एकत्र बसून ज्ञानार्जन करू शकतात . यासाठी पालिकेच्या वतीने ही अभ्यासिका वातानुकुलित करण्यात असून बैठक व्यवस्था अत्यंत आरामदायी आहे. शिवाय येथे प्रत्येकासाठी कॅबिन व लाईट व्यवस्या ही करण्यात आली आहे.या ठिकाणी संदर्भ पुस्तकांचा साठा ही खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे .या अभ्यासिकेसाठी देगलूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा नगरसेवक यांच्या वतीने संदर्भ पुस्तक देण्यात आले आहेत . त्यामूळे तत्सम स्पर्धा परिक्षा लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व इतर स्पर्धा परिक्षां साठी देगलूर शहरातील विद्यार्थ्यांना इतर शहरांमध्ये जाण्याची वेळ येणार नाही . शहरात जाऊन अभ्यास करणे ही सद्यस्थितीमध्ये अत्यंत खर्चिक बाब झाली आहे . आपल्या पाल्यास उच्चशिक्षित करण्यासाठी पालक वर्गात चिंता असते चिंतेमुळे त्यांना आर्थिक बोजा सोसावा लागतो.
शहरात ही अभ्यासिका सुरू झाल्याने आता येथील स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरातच चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल व आपले भविष्य सुरक्षित करून चांगल्या पदावर नोकरी करण्याची संधी त्यांना नक्कीच मिळणार आहे .याशिवाय देगलूर शहरात ही अभ्यासिका सुरू झाल्याने तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी व अभ्यास करण्यासाठी सोयीचे होईल.
देगलूर शहरात अशी अद्ययावत अभ्यासिका चालू केल्यामुळे अशा परीक्षार्थींनीची शैक्षणिक सोय झाली असून या चे सर्व श्रेय नगर पालिका प्रशासन तथा नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांना जाते या अभ्यासिकेमुळे निश्चितच येणारी पिढी ही मोठमोठ्या स्पर्धा परीक्षांना तोंड देऊन जीवनात यशस्वी होतील हे नक्कीच.