डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा चालवणे हीच त्यांच्यासाठी आदरांजली : प्रा जयश्री दाभाडे
रुख्मिणिताई महिला महाविद्यालयात इतिहास विभागातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) येथील रुख्मिणिताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महपरिनिर्वाण दिनानिमित्त महिला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस जे शेख हे होते.
यावेळी प्रा.सुनील वाघमारे यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर व विद्यार्थी या विषयावर प्रकाश टाकत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर माहिती देत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
तर प्रा.जयश्री साळुंके यांनी स्वरचित कविता भीमाच्या नावानं ही सादर केली. तसेच आपले विचार मांडतांना त्या म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त स्त्रियांच्या उद्धाराकरिता केलेल्या घटनात्मक तरतुदीमुळे मी केवळ प्राध्यापक, पत्रकार बनू शकले. भारतीय संविधानामधे महिलांसाठी केलेल्या तरतुदीमुळेच आज मी आणि माझ्या सारख्या असंख्य स्त्रिया विविध क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हेच आजच्या दिवशी बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.इंद्रायणी मोरे यांनी केले तर अध्यक्षीय समारोप प्राचार्य. डॉ. एस.जे.शेख यांनी केला. यावेळी ग्रंथ वाचन अभिवादन देखील करण्यात आले. कार्यक्रमाला प्रा.डॉ.आमोल दंडवते, प्रा.चारुशीला ठाकरे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.