महाराष्ट्र
मोताळा तालुक्यात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या आशीर्वादाने झाडांची कत्तल
मोताळा (मिलींद बोदडे) मोताळा तालुक्यात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या आशिर्वादाने झाडांची कत्तल होत आहे. याच्याकडे वनविभागाचे अधिकारी पाठ फिरवत आहे. म्हणून झाडांची बेपारी लोक आपली मनमानी कारभार करत आहे.
झाडांची कत्तल करणारे बेपारी लोक सरळ सागंता कि आम्ही वनविभाच्या लोकांना हप्ता देतो आमच कोणीच काही वाकड करु शकत नाही, अशी उध्दटपनाची भाषा झाडांची कत्तल करणारे माफीया बोलत आहे. महाराष्ट्रात एकिकडे उपक्रम राबविला जातो. ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा उपक्रम मोताळा वनविभागाचे कर्मचारी कागदोपत्री राबवित आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न मोताळा तालुक्यातील नागरीकांना पडला आहे.