संतश्रेष्ठ संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४५ वी जयंती उत्साहात साजरी
मुक्ताईनगर (सचिन झनके) येथील संत रविदास महाराज उत्सव समितीने आयोजित केलेल्या जयंती उत्सवास समाज बांधवांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ नगरी चे आमदार माजी मंत्री संजय सावकारे यांनी प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करून उपस्थितांना आपल्या सहज शैलीने मार्गदर्शन केले. ते कार्यक्रमाला पूर्णवेळ उपस्थित होते.
प्रसंगी मुक्ताईनगर चे कार्यसम्राट दानशूर आमदार चंद्रकांत पाटील यांनीही वेळात वेळ काढून कार्यक्रमाला भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रमुख वक्ते म्हणून आलेले डॉ. संजय भटकर यांनी आपल्या दमदार शैलीने समाज बांधवांना मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध डॉक्टर भगवान गोरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला समाजातील माता-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवरांनी भेट देऊन प्रतिमा पूजन केले त्यात काँग्रेसचे ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश दादा पाटील तसेच जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणीताई खेवलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद सदस्य वनिता ताई गवळे, माजी सरपंच ललित महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रतिमापूजन करून समाज बांधवांना जयंती च्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमानंतर सर्व समाज बांधवांनी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक धनंजयशेठ एदलाबादकर यांच्याकडून आयोजित केलेल्या स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेशभाऊ घुले, महेंद्र जयकर, मेजर कडू घुले, कैलासशेठ शिर्के, विनोद घुले, प्रवीण घुले, संतोष घुले, सचिन जयकर, सुनील जयकर, दिपक घुले, प्रवीण घुले, योगेश घुले, संजय निंभोरे सर, राजूभाऊ घुले, दिपक जयकर, मोहन घुले, भरतशेठ चिमकर, फकीरा जयकर, भागवत शिर्के, अशोक तायडे, संतोष काकडे, रवी जयकर, योगेश काकडे, रवींद्र दांडगे, विनोद सुरवाडे, धनंजय शेठ एदलाबादकर, योगेश एदलाबादकर, पुरुषोत्तम ठोसे सर, अतुल हिंगोणेकर, यांच्यासह सर्व युवा व जेष्ठ समाज बांधवांनी परिश्रम घेतले.