नेर्ले येथे मच्छरदाणीचे वाटप
शिराळा (मनोहर कांबळे) आशेचे द्वार प्रतिष्ठान ह्या संस्थेमार्फत ,सध्याच्या स्थितीमध्ये डेंग्यू सदृश्य तापाची साथ असता आरोग्य जपण्याकरता आशेचे द्वार प्रतिष्ठान संस्थेमार्फत गरजू कुटुंबीयांना मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे स्वयंसेवक रोहित कदम यांनी केली.
या कार्यक्रमाप्रसंगी मच्छरदाणीचे वाटप नेर्ले गावचे ग्रामपंचायतीचे सरपंच शोभा आण्णा पाटील आणि ग्रामसेवक विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना कोल्हापूर टीम चे परिवेक्षक निलेश काळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा दिला तर ग्रामसेवक यांनी संस्थेच्या कार्याबद्दल आभार मानले व कार्याला शुभेच्छा दिल्या. लाभार्थी उपस्थित कुटूंबाची व ग्रामपंचायत नेर्ले यांनी संस्थेचे आभार मानले. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष जोसेफ पवार संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रदीप लोंढे आणि खजिनदार जितेंद्र लोंढे ह्यांचे योगदान लाभले. तसेच स्वयंसेवक प्रशांत गायकवाड, निखिल कांबळे, कमल कांबळे, विपुल, यशवंत, नेर्ले मंडळी यांचे विशेष सहकार्य लाभले.