सांभारावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला ; अमोल भाकरे याने प्रसंगावधान राखून सांभाराला वाचविले !
कऱ्हाड (सुखलाल उपर्वट) उन्हाचा तडाखा वाढल्याने पाण्याची ओढीने राजमाची तलावात पाणी पिण्यास आलेल्या सांभारावर भटक्या 25 ते 30 कुत्र्यांनी हल्ला केला. तेथील रविवार पेठेतील अमोल भाकरे याने प्रसंगावधान राखून केलेल्या धाडसामुळे त्या सांभाराला कुत्र्यापासून जिवन दान मिळाले.

तब्बल दोन तास सांभाराचे कुत्र्या पासून अमोल ने संरक्षण केले वन विभागासह वन्य प्राणी अभ्यास काना अमोल ने माहीत देऊन बोलावल्याने सांभार सुरक्षित हलविण्यात आले. तेथे पोचलेल्या वन मजूर सुरेश शिंदे, वन्यजीव अभ्यासक हेमंत केजाळे, वन्य जीव रक्षक रोहन भाटे व स्थानिक नागरिक जोतीराम देशमुख यांनी अर्धा तास मदत कार्य राबवत सांभाराला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. कुत्र्यांनी त्यांच्या शरीराचे लचके तोडल्याने जखमा मोठ्या होत्या. मात्र पुढील उपचारासाठी पुण्यात हलवले आहे, असे वन्यजीव रक्षक भाटे यांनी सांगितले.




