महाराष्ट्र
मालपुर येथे श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण व किर्तन सप्ताह सोहळा
मालपुर (गोपाल कोळी) मालपुर हे शिंदखेडा तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. येथे धार्मिक व सामाजिक राजकीय कार्यक्रम होत असतात त्यातील संत शिरोमणी तुकाराम महाराज बिज यांचे औचित्य साधून अखंड हरिनाम किर्तन सप्ताह सुरू आहे.
येथे तुकाराम महाराजांचे भव्य दिव्य असे मंदिर आहे. पहाटे ४ ते ५ प्रभात फेरी होत असते. ५ ते ६ काकडा आरती ८ ते १० गाथा पारायण सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरिनाम किर्तन अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक ह.भ.प. रामचंद्र महाराज यांनी स्पीड न्युजशी बोलताना सांगितले. त्याप्रसंगी विक्रम पाटील नारायण महाराज विणेकरी सुरेश महाराज व पत्रकार प्रभाकर अडगाळे, वसंत आबा महाराज, सम्राट गोपाल कोळी, राजाराम महाराज व समस्त ग्रामस्थं मंडळी उपस्थित होते.