मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने दुचाकीस्वारांना दिली जबर धडक
तळोदा (दिपक गोसावी) तळोदा शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर बाजार समितीत उभे असणारे ट्रॅक्टर चोरीच्या उद्देशाने पळवून नेणाऱ्या मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथिल खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शुक्रवारी साडे पाच वाजेच्या सुमारास तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एक ट्रॅक्टर उभे होते. ते ट्रॅक्टर अज्ञात मद्यधुंद व्यक्तीने चोरी करण्याच्या उद्देशाने सुरू करून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सिव्हिल हॉस्पिटल चा मागच्या बाजूने उंटावद कडे जाणाऱ्या रस्त्यावर शेतात दुचाकीने जात असणाऱ्या तळोदा शहरातील खानदेशी गल्लीत राहणाऱ्या रोशन भटू माळी व चेतन विजय वाघ या दोन्ही युवकांना मदधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या इसमाने धडक देऊन परत त्यांचा अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला.अपघातात जखमी झालेल्या दोन्ही युवकांनी कसाबसा स्वतःचा बचाव करत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती त्यांनी मित्रांना फोन करून दिली. त्याच दरम्यान ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
थोड्या वेळात घटनास्थळावर संपर्क झालेले व्यक्ती दाखल झाले व दोघ जखमी युवकांना घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर दोघांना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथिल रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी मोहन माली, बबुभाऊ माली, शिवसेना शहर प्रमुख जीतेंद्र दुबे, शिवसेनेचे सुरज माळी, अतुल कर्णकार, सुनील माळी, ऍड सचिन राणे, पराग माळी आदी दाखल झाले. उशिरा पर्यत मद्य धुंद ट्रॅक्टर चालकाचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी ट्रक्टर चोरी अथवा आपघाताची नोंद करण्यात आली नव्हती.