महाराष्ट्र

आ.राजेश पाडवी यांची विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी शेतकरी वीज बिलाबाबत बैठक !

शेतकरी तसेच घरगुती ग्राहकांना वीज बिल भरून सवलत घेणे बाबत आवाहन

तळोदा (दिपक गोसावी) आ.राजेश पाडवी यांनी नंदूरबार तसेच तळोद्याच्या विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची आपल्या कलावती फार्महाऊस या निवासस्थानी सोमवल येथे बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये शहादा, तळोदा मतदारसंघातील शेतकरीवर्ग मागील ५-६ वर्षापासून लोडशेडिंग ओव्हरलोड, विद्युत पुरवठा खंडित होणे या समस्येमुळे हैराण व त्रस्त झालेले असून सिंचन तसेच पाण्याअभावी त्यांच्या पिकांच्या उत्पादनात घट येत असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

याबाबत आ. राजेश पाडवी यांना मतदारसंघात गावोगावी भेटीच्या वेळी असा एकही दिवस गेला नाही की शेतकऱ्यांनी त्यांना याबाबत निवेदन अथवा तक्रार केली नाही. मागील ३-४ महिन्यांपासून आ. राजेश पाडवी हे सतत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अधिकाऱ्यांशी तसेच त्यांच्या वरिष्ठ पातळीवर हा विषय मांडत होते. तसेच शहादा व तळोदा तालुक्यातील शेतकरी जिथे ओवरलोड आहे व कृषी पंप फक्त २ ते ३ तास चालतात. त्या शेतकऱ्यांचे नवीन रोहित्र बसविण्याचे प्रस्ताव जमा करत होते.

याला अनुसरून आज दिनांक १८ वार शुक्रवार रोजी कलावती फार्महाउस सोमावल बुद्रुक तालुका तळोदा येथे अधीक्षक अभियंता बोरसे मंडल कार्यालय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित नंदुरबार,तसेच उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील, तळोदा उपविभाग महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तळोदा यांच्यासोबत सखोल चर्चा करून पुढे काय उपाययोजना करता येतील याच्यावर विचार मंथन करण्यात आले. यात आमदार राजेश पाडवी यांच्याकडे जमा असलेले नवीन रोहित्र प्रस्ताव अधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आले.

आदिवासी बहुल शेतकऱ्यांच्या अडचणी विचारात घेता आज बैठकीत चर्चेअंती असे ठरले.कि दिनांक २५ रोजी सोमावल बुद्रुक तालुका तळोदा येथे ग्रामपंचायत कार्यालयात विद्युत वितरण ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात यावे. या केंद्रात शेतकऱ्यांचे वीज बिल स्वीकारण्यात येतील. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने माहे सप्टेंबर २०१९ अखेर थकबाकी व ५० टक्के सूट जाहीर केलेली आहे. व एक ऑक्टोबर २०१९ नंतर चे आज पावेतो चे बिल हे १०० टक्के भरणे हे अनिवार्य आहे. या ग्राहक केंद्रात आलेल्या बिलाची रक्कम पैकी ३० टक्के रक्कम त्या गटातील वीज बिल अदा केलेल्या शेतकऱ्यांना नवीन रोहित्र व इतर आवश्यक दुरुस्ती देखभालीचा कामासाठी खर्च वापरण्यात येईल ही सवलत दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत असून त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आमदार राजेश पाडवी यांच्याकडून आव्हान करण्यात येत आहे. तसेच घरगुती वापरासाठी ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, ज्यांचे मीटर काढून नेले आहेत त्यांची थकबाकी विजेच्या बिलात व्याज व दंड माफ करून त्वरित नवीन कनेक्शन देण्यात येतील. या सवलतीचा घरगुती ग्राहकांनी फायदा घेऊन घरगुती कनेक्शन बाबत वीज वितरण कंपनीस सहकार्य करावे असे आमदारांनी आव्हान केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे