धुळे तालुका पोलिस स्टेशची कौतुकास्पद कामगिरी ; बारा तासात मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस
धुळे (करण ठाकरे) दिनांक १४/२/२२ रोजी सकाळी दहा वाजता श्रीराम स्टील स्टाल छाजेड पेट्रोल पंप समोर फागणे येथे नंदलाल भावराव पाटील हे चहा पिण्यासाठी थांबले असता त्यांच्या जवळ असलेला वीवो कंपणीचा मोबाईल फोन हा ते बील देण्यासाठी कांऊटर वर गेले असता तीन अज्ञात मुलांनी उचलुन पळ काढला सदर अज्ञात मुलांनी पळ काढल्यानंतर मोबाईल मालक नंदलाल पाटील यांनी धुळेतालुका पोलिस स्टेशन गाठले व सदरचा घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १९०३ / २२ भा.द.विकलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास तालुका पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत बारकाईने करून सदर गुन्हयातील आरोपींना बारा तासात पकडण्यात यश मिळवले. सदर अरोपी (१) समाधान उर्फ दादु दत्तात्रय पाटील वय २९ (२) गोपाल पाटील व १९ (३) अमित सुभाष घोडेसोर (फरार) राहणार तिघे बाळापुर तालुका जिल्हा धुळे यांनी केल्याचे निष्पन्न झाले तरी दोघ आरोपींनादिनांक १५/२/२२ रोजी अटक करण्यात आली असुन त्यांनी चोरलेला मोबाईल फोन हा त्यांच्या कडुन हस्तगत करण्यात आला. अरोपी कडे कौशल्याने तपास केल्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे चौदा फोन हस्तगत करण्यात आले सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रविण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, अविभागिय पोलिस अधिकारी प्रविप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने सदरची कामगीरी केली. सदर गुन्ह्यातील तपासाने तालुका पोलिस स्टेशचे सगळी कडे कौतुक केले जात आहे.