महाराष्ट्र
मालपुर जिल्हा परिषद शाळा नं१ येथे आधार कार्ड कॅम्प संपन्न
मालपुर (गोपाल कोळी) मालपुर केंद्रा अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी चे आधार कार्ड काढणे / दुरुस्ती करणे यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा धुळे यांच्या आदेशान्वये आधार कार्ड कॅम्प संपन्न झाला.
दि. १७ व १८ फेब्रुवारी हे दोन दिवसीय कॅम्प चे नियोजन करण्यात आले. दोंडाईचा येथील श्री काॅंम्यपुटर चे तंत्र सहाय्यक विजय बडगुजर यांनी काम पाहिले सदर कॅम्प यशस्वी करण्यासाठी म.हा. शिक्षण विस्तार अधिकारी सोनवणे, केंद्रप्रमुख जाधव, मुख्याध्यापक चैधरी, गोकुळ बच्छाव, अध्यक्ष. शाळा व्यवस्थापन समिती संजय बैसाणे व शाळा नं १ शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले व उपस्थित होते.