छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हळणी येथे इंन्साफच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न
नांदेड (प्रतिनिधी) मुक्रमाबाद परिसरातील हाळणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ या सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य असे आरोग्य शिबिर संपन्न झाले. या आरोग्य शिबिराचा लाभ गावातील युवक व वयोवृध्द व्यक्तींनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गावातील सर्व जेष्ठ नागरीक यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख उपस्थितीत सरपंच महादाबाई रोहिदास गोदू, उपसरपंच अमोल बा-हाळे, श्रीराम पाटील,धनाजी पाटिल, बालाजी राठोड, अशोक काळे, सादक शेख,रियाज शेख, वैभव बोरूळे, शेख अहमद, शेख रफी, क्रष्णा पाटिल,गंगाधर रोटेवाड, राजकुमार बिळाळे, सचिन बिरादर, संग्राम पाटिल,सहित तज्ञ डॉ. म्हणून डॉ. विजय बिराजदार, डॉक्टर मनोहर सूर्यवंशी सह जलील पठाण पञकार अशोक लोणीकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफचे शाखाध्यक्ष शेख सैलानी, शेख दस्तगीर ,बबलू शेख, शेख फैय्याज,शेख आसिफ, मोसीन शेख, मगबुळ पठाण, रुपेश वळंके, शेख मौला अ,पद्माकर वाकडे ,आसिफ पठाण, गंगाधर रोटेवाड, समीर शेख ,अहमद शेख यांनी परिश्रम घेतले.