मालपुर चौफुली ते कडव्या रस्त्याच्या नाल्याला संत शिरोमणी श्री नामदेव महाराज नामकरण करावे !
दोंडाईचा नगरपालीका प्रशासककडे शिंपी समाज मंडळाची मागणी
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथे दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदे मार्फत दैनीक पुण्यनगरी या वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीर सुचनेनुसार शहरातील जातीयवाचक वस्ती, रस्ते इत्यादीची आवश्यकता असल्यास नावे बदलुन महापुरुषांची किंवा लोकशाही मुल्यांशी निगडीत नांवे घ्यायची आहेत. म्हणून ह्या मुद्द्यावर गावातील नागरिकांची मते व लेखी स्वरूपात मागणी करण्यात आली आहे. त्या सुचनेला अनुमोदून प्रथम दोंडाईचा शिंपी समाज संस्थेने आपल्या समाजाच्या झालेल्या जनरल मिंटीगमध्ये शहरातील मालपुर रोड वर असलेल्या शिंपी समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर नियोजित संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर स्थापना होणार आहे. म्हणून या मालपुर चौफुली पासुन कडव्या पर्यन्त रत्याला संत शिरोमणी श्री नामदेव महाराज मार्ग असे नामकरण देण्या संदर्भात ठराव करण्यात येऊन नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी हर्षल भामरे व दोंडाईचा नायब तहसीलदार आँफिस येथे नितिन सोनवणे, अव्वल कारकुन तहसीलदार आँफिस यांना अध्यक्ष हरिदास जगताप यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देतांना प्रा. प्रकाश भांडारकर सहसपादंक नामविश्व मंध्यवंर्ती संस्था, मनोज मेटकर उपाध्यक्ष शिंपी समाज, मधुकर जाधव, पांडुरंग शिंपी धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मंध्यवंर्ती संस्था, मुकूंदा बाविस्कर, सुवर्णाताई खैरनार, लक्ष्मीकांत खैरनार सचिव शिंपी समाज, सतीष जाधव नामविश्व प्रतिनिधी, देवेंद्र गवळे माजी युवा अध्यक्ष, सागर पवार युवा अध्यक्ष शिंपी समाज दोंडाईचा आदी उपस्थित होते.