शिवजंयतीचे श्रेय घेतले नाही तर मग सोशल मिडीयावर व्हीडीओ टाकुन शिवभक्तांचा अपमान का केला ?
दोंडाईचा (प्रतिनिधी) दोंडाईचा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी शिवभक्तानी उत्सव समिती स्थापन केली. शिवजंयती उत्सव समिती दिवस रात्र फिरुन शिवजंयती आनंदात साजरी होईल त्यासाठी पुर्व तयारी सुरु आहे पुर्वीचे शहरात जुने स्मारक आहे आणि ते स्मारक छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून प्रसिद्ध आहे स्टेशन भागावर येतांना आणि जातांना शिवाजी महाराज यांचे दर्शन होते या ठिकाणी पुर्वीपासुन शिवजंयती साजरी होते हि परंपरा सुरू आहे आणि राहिल शहरात नव्याने नगरपालिका आणि आमदार निधीच्या माध्यमातून नंदुरबार चौफुलीवर शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले गेले.
छत्रपती शिवाजी महाराजांवर शिवप्रेमींची आस्था आणि श्रद्धा मनापासून आहे म्हणून आम्ही शिवभक्त कधीही भेदभाव करीत नाही महाराजांचे दोन्ही स्मारक शिवभक्तांसाठी समान आहेत. त्यामुळे दोन्ही स्मारकाची भक्ती भावाने पुजा होईल परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी आमदार जयकुमार रावल यांच्या अथक परिश्रमाने यंदाची शिवजंयती आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरी होणार असा व्हीडीओ सोशल मिडीया रावल ग्रुपच्या पी.आर.ओ यांनी टाकल्याने शिवभक्ताचा अपमान करून शिवजंयतीचे श्रेय घेण्याच्या उद्देशाने व्हीडीओ टाकला परंतु तो उदेश सफल झाला नाही शिवभक्ताची मेहनत आणि दोंडाईचाकर नागरिकांचे सहकार्य असे दुहेरी संगमाने शिवजंयती साजरी होते जो व्हीडीओ टाकला त्या व्हीडीओ चा विरोध झाला शिवभक्तांमध्ये नाराजी निर्माण झाली त्यामुळे व्हीडीओ टाकल्यामुळे नुकसान होईल म्हणून खुलासा करावा लागला श्रेय कोण घेत आहे जर श्रेय घ्यायचे नाही तर व्हीडीओ का टाकला ? व्हीडीओ टाकण्याची ही वेळ होती का ? शिवाजी महाराज यांचे स्मारक दोन महिन्यापूर्वी झाले त्यावेळी महाराजांचे स्वागत सर्व शिवप्रेमी ‘शिवभक्तानी केले शहरात शिवाजी महाराजांचे स्मारक झाले सर्वांना आनंद झाला परंतु शिवजंयतीच्या अगोदर व्हीडीओ टाकण्याची गरज का ? आली या मागे राजकीय फायदा होईल असा उदेश तर नाही ना ?
आकाश कोळी
एक शिवभक्त



