शिवजयंती साजरी करू या अनोख्या पध्दतीने
धुळे (करण ठाकरे) संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात शिवजयंती साजरी होत असते. शिवजयंती म्हणजे आम्हा शिवभक्तांसाठी जणू उत्साहात असतो असंख्य शिवभक्त उत्साहाने व आनंदाने शिवजयंती साजरी करत असतात यासाठी खूप ठिकाणी गावागावात भंडारे ठेवले जाते. त्याचबरोबर भरपूर जण डीजे लावून शिवजयंती साजरी करत असतात. प्रत्येक जण आपल्या परीने शिवजयंती वेगवेगळ्या पध्दतीने साजरे करत असतो. शिवरायांना मानवंदना देत असतो. याला माझा मुळीच विरोध नाही. परंतु प्रत्यक्ष शिवजयंती आपल्याला साजरी करायची असेल तर या वेळी शिवजयंती आपण नाचून साजरी न करता वाचून साजरी करावी. शिवजयंतीनिमित्त आपण विभिन्न अशा चांगल्या उपक्रमांचे आयोजन करू शकतो. आपण सर्वांनी निश्चय केला की शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करूया अनोख्या म्हणजे वेगळ्या पध्दतीने शिवजयंती कशी साजरी करावी.
आपण या शिवजयंतीनिमित्त विभिन्न बालगोपालांना शिवाजी महाराजांचे चरित्र भेट देऊ शकतात. यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व त्यांनी केलेले कार्य लहान मुलांना आपल्या जीवनात बिंबवता येईल. लहान बालगोपाल व तरुण मुलं या चरित्रातून आयुष्यात कसा उपयोग द्यायचा त्याविषयी बोध घेऊ शकतील. या चरित्र वाचनामुळे त्यांच्या जीवनाला एक नवीन सकारात्मक दिशा मिळेल. कसे वागावे कुठल्या क्षणी माघार घ्यावी कुठल्याही क्षणी आयुष्यात पुढे जावे हे सगळे शिव चरित्रामध्ये आहे. शिवचरित्र सर्व बालगोपाळ व तरुणांनी वाचल्यास ते कधी वाईट वळणाला किंवा वाईट व्यसनाच्या मार्गी लागणार नाहीत. या निमित्ताने आपण ठिकठिकाणी शिवचरित्राचे पारायण करू शकतो. पारायण करताना ते फक्त वाचण्यावर भर न देता ते शिवचरित्र आपल्या जीवनात कशी उपयोगी पडतील यासाठी आपण विभिन्न व्याख्यानांचे आयोजन करू शकतो. सर्व जीवनउपयोगी शिवचरित्र सगळ्यांना आयुष्य जगण्यासाठी कसे उपयोगी आहे. हे सगळ्यांच्या मनावर बिंबवू शकतो, असे केल्यास शिवचरित्र वाचा व यशस्वी जीवन जगा हे वाक्य खरोखरच योग्य राहील. या वेळेस आपण सर्व शिवभक्तांनी ठरवूया. की शिवजयंती ही विचारात्मक विचार देऊन साजरी करूया. त्याचबरोबर आपण शिवजयंतीनिमित्तइतरांना मदतकार्य करु शकतो. छत्रपती शिवराय सर्वधर्म समभाव बाळगतो. या निमित्ताने आपण विद्यार्थ्यांना सर्वधर्मसमभावशिवराय कसे बाळगत याचे वर्णन करून किंवा पारायण यूपीमध्ये ते स्पष्टीकरण देऊन समजू शकतो. यामुळे आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे की समाजक्टक धर्मा धर्माच्या नावावर लढवतात. दंगली घडवतात. ते होणार नाही या शिवजयंतीनिमित्त तापन गरजूंना मदत करु शकतो या कोरोना काळामध्ये असंख्य घरे बरबाद झाली. भरपूर मुलांचे छत्र हरविले.. कुगाचे वडील कुणाची आई खुनाचे भाऊ चुणाची बहीण कुणाचा मुलगा खुनाची मुलगीतर कुणाच्या आमजन किंवा मित्र हरविले कोरोणा काळातील असंख्य दुःखद प्रसंग आपल्या मनात आहेत. असंख्य लोकांचेव्यवसाय ठप्प झाले. भरपूर लोकांचे रोजगार गेले. पुढे काय करावा व कसे जगावे असे भरपूर लोकांसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या शिवजयंतीनिमित्त आपण सर्वांनी निश्चय करूया की आपण खुराणा काळात छत्रछाया हलविलेल्या मुलांना मदत करूया ज्या मुलांना आई किंवा बडील नसतील त्या मुलांची शाळेची जबाबदारी आपण आपल्या मंडळातर्फे किंवा सर्व शिवभक्तांनी स्वीकारू या म्हणजे समजा तो मुलगा किंवा मुलगी आता पाचवीलाआहे तर आपण त्याच्या शालेय गणवेशापासून वद्या पुस्तकांपासून ते शाळेची फी भरण्यापर्यंत सगळी जबाबदारी स्वीकारावी. त्याला वर्षभरात लागणारी जेवढी फीस असेल जेवढा खर्च असेल त्यात बसची फीस पकडून सुद्धा आपण त्याच्या घरी चेकने पैसे देऊ शकतो. यामुळे तो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही. तो आनंदाने शिक्षण घेईल. ही जबाबदारी आपण एक किंवा दोन वर्षांसाठी न घेता बारावीपर्यंत त्या विद्यार्थ्यांची ही जबाबदारी स्वीकारावी. यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सहज व सुलभ रीतीने होईल. तो आपल्या पायावर उभा राहण्यास सक्षम होईल यासाठी आपले विभिन्न मंडळ असतात किंवा आपण सर्व मित्रांनी एकत्र यावे. त्या विद्यार्थ्यास किती खर्च लागतो तो काढून घ्यावा. सगळ्या मंडळातल्या सभासदांनी किंवा मित्रांनी तो खर्च त्या विद्यार्थ्यास द्यावा. आपण सर्वांनी असे केल्यास निश्चितच शिवजयंती साजरी केल्याचे समाधान आपणाला लाभेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळात असंख्य कष्टकरी श्रमजीवी जिवांना मदत केलेली आहे. त्यांच्यासाठीच स्वराज्य उभं केलेलं आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय असे आपले स्वराज्य त्यासाठीच महाराजांनी निर्माण केले. आपण सर्वानी जर अशी मदत केल्यास निश्चितच आपणाला आपली शिवजयंती सार्थकी लागल्यासारखे वाटेल,