महाराष्ट्र
शिंदखेडा येथे सचिन महा ई सेवा केंद्राच्या वतीने मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील सचिन महा ई सेवा केंद्राच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भव्य टु व्हिलर, थ्री व्हिलर, फोर व्हिलर मोटारसायकल लायसन्स, एस.टी. बिल्ला व आर टी ओ विषयी संपूर्ण कामाचा एक दिवसीय मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन उदया रविवार दि. 20-2-22 रोजी सकाळी – 10 ते 5 वेळेस होणार आहे.
सदर शिबीर सचिन महा ई सेवा केंद्र कलश टाॅवर स्टेट बँक जवळ शिंदखेडा येथे संपन्न होणार असून शहरातील व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सचिन महा ई सेवा केंद्राचे संचालक अरुण मोरे व विजय मोरे यांनी केले आहे.