महाआरती व महाशिववादन कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
युवा व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते आयोजन
सिल्लोड (विवेक महाजन) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे याहीवर्षी सिल्लोड शहरातील युवा व्यापारी सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने महाआरती व महाशिववादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.

युवा व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने मुख्य बाजारपेठेत छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाआरती कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर शिवगर्जनेसह महाशिववादनाचा गजर करण्यात आला. यावेळी ढोल ताशे व जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतिष ताठे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक विशाल जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, गौरव सहारे, प्रवीण कटारिया, अकिल देशमुख यांच्यासह शैलेश झंवर, शितल गोसावी ,राकेश कटारिया ,प्रमोद गोयल ,शैलेश गौर ,वैभव कुलकर्णी,गणेश शेलार ,प्रवीण काळे, कुणाल सहारे, निलेश शिरसाठ ,दत्ता बांबर्डे, संतोष गाडेकर, गोविंद लाठी , आशिष कटारिया, निखील जैन, निखील सोनार, गौरव खंडेलवाल, मयूर शेजुळ, गणेश काळे ,आनंद अग्रवाल ,अक्षय अग्रवाल, बॉबी चौधरी, ओम घरमोडे, कृष्णा देवळे, दत्ता बांबर्डे, गोपाल कुमावत, राहुल शामनानी, ऋषिकेश बांबर्डे, ऋतुराज घरमोडे आदींसह शहरातील व्यापारी व नागरिकांची उपस्थिती होती.



