शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यान व नेत्र तपासणी शिबीर संपन्न
धुळे शहरातील मोगलाई परिसर येथे मोफत मोतीबिंदू शस्यक्रिया शिबीर
धुळे (प्रतिनिधी) राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोगलाई परिसरातील जूने टि.व्ही. सेंटर येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर व व्याख्यान संपन्न झाले. सदर शिबीराचे उद्घाटन धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबीरामध्ये कांतालक्ष्मी शाह रुग्णालयाचे तज्ञ व अनुभवी डॉक्टर मोफत डोळे तपासणी व मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जात आहे. तसेच अल्पदरामध्ये चष्मे देखील उपलब्ध करण्यात आलेले होते. यावेळी मोगलाई, गवळीवाडा परिसरातील नागरिकांनी शिबीराला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. असंख्य नागरिकांची नेत्र तपासणी यावेळी करण्यात आली. लवकरच काही लोकांची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. सदर कार्यक्रम ठिकाणी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य नागरिक यांच्यासाठी व्याख्यानाची मेजवानी ठेवलेली होती. व्याख्यानामध्ये कॉम्रेड एल.आर. राव यांनी शेतकरी कायदे या विषयांवर सर्वांना माहिती दिली. तसेच वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रसाद महाले यांनी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे जीवन चरित्राची सविस्तर माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस रईस काझी, ओबीसी सेल सरचिटणीस विकास घुगरे, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष राज कोळी, शहर संघटक कृष्णा गवळी, अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष अस्लम खाटीक यांनी केले होते. या कार्यक्रमाला रणजीत राजे भोसले, वसीम मंत्री, जगन ताकटे, मुख्तार मन्सूरी, जीतू पाटील, राजेंद्र सोलंकी, राजू डोमाडे, राजेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर माळी, हाशिम कुरेशी, शकीला बक्ष, आनंद पाटील, स्वप्निल पाटील, महेंद्र बागूल, मयुर देवरे, दत्तू पाटील, योगेश ठाकरे, सोनू घारु, उमेश महाले, स्वामिनी पारखे, विश्वजीत देसले, प्रसाद महाले, अमित शेख, रोशन खाटीक, असद शेख, संजय सरग, ऋषी देवरे, धनंजय पाटील, प्रितेश अग्रवाल, भावेश भदाणे व सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गरजूंनी व परिसरातील नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद देवून शिबीराविषयी समाधान व्यक्त केले.