महाराष्ट्र
सोयगांव शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसाविण्यात यावे ; व्यापारी महासंघाची मागणी
सोयगांव (प्रतिनिधी) शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसाविण्यात यावे अशी मागणी व्यापारी महासंघ सोयगाव यांनी निवेदनाद्वारे नगरपंचायतकडे आज केली.
यावेळी नगराध्यक्ष आशाबी तडवी व नगरसेवक गटनेता अक्षय काळे, नगरसेवक, संतोष बोडखे, राजु दुत्तोंडे, हर्षल काळे, संदिप सुरडकर, दिपक पगारे, भगवान जोहरे, गजानन कुडके, अशोक खेडकर, किशोर मापारी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विवेक महाजन, उप अध्यक्ष निकेश बिला सचिव प्रमोद रावणे, संचालक महेश, राऊत, ईश्वर गव्हाडे, आकाश वरकड,कदिर शाहा, परदेशी, व व्यापारी बंधु व नगर पंचायतीचे कर्मचारी गावकरी उपस्थित होते.