सिंधी समाजाचे धर्मगुरू साई साधराम तसेच रोहितलाल यांचे सिल्लोड येथे आगमन
सिल्लोड (विवेक महाजन) सिंधी समाजाचे धर्मगुरू साई साधराम तसेच रोहितलाल यांचे सिल्लोड येथे आगमन झाले. यावेळी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी साधराम यांचे स्वागत केले. यावेळी शहरातील भगवान महावीर चौक ते शास्त्री कॉलनीतील संत झुलेलाल बाबा हॉल पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
मिरवणुकी नंतर संत झुलेलाल बाबा हॉल मध्ये कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सिंधी समाज बांधवांच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार गुरुमुख जगवानी, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतीश ताठे नगरसेवक राजू गौर , अनिल बोरा, भिकचंद कर्णावट यांच्यासह माधव सेट कटारिया, रामसेट कटारिया, राजुसेट कटारिया, प्रवीण कटारिया, जगदीश मोटवाणी, कमलाराम फेरवानी, सुमित कावणा, शामलाल भोजवाणी, गौरव सहारे, शैलेश गौर, आशिष कटारिया, धीरज गौर, सागर गायकवाड, बॉबी चौधरी, आनंद सिरसाट यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.