शिंदखेडा तालुक्यातील तामथरे परिसरातील आदिवासी समाज मोफत शिधापत्रिकेपासुन वंचित ; भिल समाज विकास मंचतर्फे तहसीलदार यांना निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील तामथरे, डांगुर्णे, मुकटी या गावातील आदिवासी समाजातील सहा महिने उलटले तरी मोफत शिधापत्रिकेपासुन वंचित आहेत. तरी त्वरित शिधापत्रिका तयार करून मिळाव्यात यासाठी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा संघटक भाऊसाहेब मालचे यांच्या उपस्थितीत तहसीलदार सुनील सैदाणे यांना निवेदन सादर करण्यात आले.
आदिवासी विकास विभागाचे मंत्री के.सी.पाडवी यांच्या सुचनेनुसार दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजातील वंचित घटकांना मोफत शिधापत्रिका वितरित करण्यात यावे त्यानुसार तामथरे, मुकटी, डांगुर्णे या गावातील जवळपास तेवीस प्रकरणे सप्टेंबर महिन्यापासुन सादर केली आहेत. मात्र पुरवठा विभागाकडून वारंवार टाळाटाळ केली जात आहे. म्हणुन आज संतप्त आदिवासी समाजातील लोकांनी जिल्हा संघटक भाऊसाहेब मालचे यांच्या उपस्थितीत तहसीलदार सुनील सैदाणे यांना निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या. त्यावर पुरवठा अधिकारी धुदे यांना प्रत्यक्ष बोलावून त्यांना दोन तीन दिवसात शिधापत्रिका तयार करण्याचे निर्देश तहसीलदार यांनी दिलेत.
याप्रसंगी जिल्हा संघटक भाऊसाहेब मालचे, विशाल भिल, अशोक भिल, निखिल भिल, भावसाहेब भिल, लहु भिल, बन्सी भिल, सतीलाल भिल, कैलास भिल, मनोहर भिल, मोतीलाल भिल, निलेश भिल, शामसिंग भिल, मच्छिंद्र भिल, रोहिदास भिल, हरदा भिल, भटु भिल, पिंटू भिल, आनंद भिल, रामभाऊ भिल, मका भिल, जयेश भिल आदी उपस्थित होते.