वशेणी येथे आगीत भस्मसात झालेल्या घरामुळे गावंड कुटुंबाना आर्थिक मदतीची गरज !
उरण (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील वशेणी गावातील समीर रामकृष्ण गावंड व कुंजवी रामकृष्ण गावंड यांच्या राहत्या घराला रविवार दि 20/2/2022 रोजी संध्याकाळी 7:15 च्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीमध्ये त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. गावंड यांच्या संसाराची, स्वप्नांची राख रांगोळी झाली. दहा लाखाहून अधिक मालमत्तेचे नुकसान गावंड कुटुंबियांचे झाले. आगीमुळे राहते घरच जळून खाक झाल्याने गावंड कुटुंबियांवर भलेमोठे आर्थिक संकट ओढवले आहे. दुर्दैवाने खूप मोठी घटना घडली. सुदैवाने या आगीमुळे कोणतेही जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले मात्र घरातील सर्व सामान जळून खाक झाली.
संकटात सापडलेल्या व्यक्तीला, कुटुंबाला मदत करणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी तथा विद्यमान पंचायत समिती सभापतीचे समिधा म्हात्रे यांनी 10,000 रुपयांची, काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी 10,000 रुपयेची तर पिरकोन येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून 5000 रुपये व मुलांना कपडे दिले. या सर्वांनी आपल्या परीने गावंड कुटुंबियांना मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. गावंड कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवले असून त्यांना आधाराची मोठी गरज असल्याने अनेक सामाजिक संस्था, संघटना, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आपापल्या परीने गावंड कुटुंबियांना मदत करीत आहेत. आगीमुळे अख्खे संसार घर दार उघड्यावर आलेल्या गावंड कुटुंबियांना मदत करावयाची आहे त्यांनी समीर रामकृष्ण गावंड फोन नंबर 9594589948 या नंबर वर संपर्क साधावे. गुगल पे /फोन पे नंबर 9594589948 या नंबरवर आर्थिक मदत करावी. असे आवाहन विविध सामाजिक संस्था, संघटनांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.