गुन्हेगारीचोपडा
चोपडा ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई ; १४ तलवारीसह चार आरोपी व ओमनी ताब्यात
चोपडा (विश्वास वाडे) सत्रासेन जवळ ओमनी गाडीत १४ तलवारी घेऊन जाणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. यात चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यात एक आरोपी मत्रा फरार होण्यात यशस्वी झाला.
चोपडा ग्रामीण पोलिसा व पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीवरून तालुक्यातील सातपुडा भागात असलेल्या सत्रासेन गावाकडून येणाऱ्या ओमनी गाडीची पोलिसांनी सापळा रचून तपासणी केली असता त्या गाडीत १४ तलवारी आढळून आले. ओमनी गाडी सह १४ तलवारी व चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. एक आरोपी फरार झाला आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू असल्याचे व आरोपी हे चाळीसगाव भागातील असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावळे चोपडा ग्रामीणचे पी.आय. देविदास कुनगर यांनी सांगितले.