जिल्हा रुग्णालयात आता लवकरच एमआरआय सुविधा ; मंत्री राजेश टोपेंनी शहराचे आमदार यांना दिले आश्वासन
धुळे (स्वप्नील मराठे) धुळे जिल्हा रुग्णालयात एम. आर. आय. मशीन नसल्यामुळे रुग्णालयांना खाजगी ठिकाणाहून एम. आर. आय करण्यासाठी आर्थिक भुदंड सहन करावा लागत होतो. याबाबत शहराचे आमदार डॉ. फारूख शाह यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी भेट घेतली. यावेळी मंत्री टोपे यांनी एम. आर. आय मशीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
जिल्ह्यातील सर्वसामान्य, गोर गरीब, गरजू, कष्टकरी नागरिक मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. मेंदू विकार किवा इतर जटील आजाराचे रुग्णांचे निदान व्हावे, यासाठी सध्यास्थितीत जिल्हा रुग्णालयामध्ये एम. आर. आय. मशीन नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. मंत्री राजेश टोपे यांना निवेदन देतांना आमदार डॉ. फारुख शाह तसेच खर्चिक बाब असल्याने रुग्ण व नातेवाईकांची आर्थिक अडचणी येतात. मंगळवारी आमदार फारूक शाह यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहाणी केली असता रुग्णांनी व अधिकाऱ्यांनी एम. आर. आय मशीनची मागणी केली. त्या अनुषंगाने आमदार शाह यांनी मंत्री रजेश टोपे यांची मंत्रालयात भेट घेवून मागणीचे पत्र दिले. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच जिल्हा रुग्णालयात मशीन उपलब्ध केली जाईल असे आश्वासन मंत्री राजेश टोपे यांनी दिले.