परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत दोन प्रेमी युगलांची चाकूने गळा कापून आत्महत्या
अचलपूर (प्रतिनिधी) परतवाडा अंजनगांव मार्गावरील येनी पांढरी जवळ राकेश अगरवाल यांचे शेतात दोन प्रेमी युगलांचा मृतदेह आढळला. परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत दोन प्रेमी युगलाने चायना चाकूने गळा कापून जीवन यात्रा संपविली आहे. परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील येणी पांढरी शेतशिवारात दोघांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
दोघेही कांडली येथील रहिवासी विवाहित प्रेमी युगल, एकमेकांची गळा कापून प्रथमदर्शनी आत्महत्या केल्याचा संदेह पोलिस घटनास्थळी दाखल झाली. यामध्ये मृत सुधीर रामदास बोबडे (वय ४८ राहणार कांडली) आणि महिलेचा नाव अलका दोडके दोघेही कांडली येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. परतवाडा पोलीस आणि आयपीएस हसन गोहर यांना घटनास्थळवर उपस्थित मिळालेली माहितीनुसार दोघेही विवाहित आहे. सुधीर याचा कविठा स्टॉपवर महाकाल नावाची पानटपरी आहे. सुधीर यांनी अलकाचा गळा कापून नंतर आपला गळा कापला असा प्राथमिक अंदाज आहे. मागील रात्रीपासून दोघही घरातून गायब होते. परिवारातील सदस्य कडून परतवाडा पोलीस पुढील तपास घेत आहे. ही कारवाई ठाणेदार परतवाडा संतोष ताले यांचे मार्गदर्शनाखाली परतवाडा पोलीस करीत आहे