महाराष्ट्र
मालपुर येथे गजानन महाराज मंदिराचे भूमिपूजन
मालपुर (गोपाल कोळी) शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे श्री गजानन महाराज मंदिराच्या भुमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य महाविर सिंहजी रावल यांचा हस्ते भुमिपूजन सोहळा पार पडला.
यावेळी सरपंच मच्छिंद्र शिंदे, सदाशिव गोसावी, उपसभापती पंचायत समिती हेमराज नाना पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी व सरपंच मालपुर व्यांघ्रबंरी दुध डेअरी चे चेअरमन पोपट बागुल, गोपाल दुध डेअरीचे चेअरमन श्रावण तात्या अहिरे, उपसरपंच संतोष भावराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शिंदखेडा तालुका कार्यध्यक्ष प्रकाश तात्या पाटील, उपसरपंच तुकाराम माळी, सकाळ वृत्तसेवाचे पत्रकार भलकार, ग्रा.पं. सदस्य रविंद्र पाटील, ग्रा.पं.सदस्य प्रतिनिधी अरूण धनगर, श्रीराम अहिरे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व परिसरातील महिला माता मोठ्या संख्येने उपस्थित होते.