महाराष्ट्रराजकीय
विक्रमगडच्या नगराध्यक्षपदी निलेश पडवळ आणि उपनगराध्यक्षपदी महेंद्र पाटील
विक्रमगड (प्रतिनिधी) विक्रमगड नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी विक्रमगड विकास आघाडीचे निलेश (पिंका) पडवळे यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता तर उपनगराध्यक्ष पदासाठी महेंद्र तुकाराम पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यावर निलेश पडवळे नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी महेंद्र तुकाराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा बुधवार च्या विशेष सभेमध्ये पिठासन अधिकारी उपविभागिय अधिकारी भवानजी आगे पाटील यांच्याकडुन करण्यात आली.