नामांकित कंपन्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
धुळे (विक्की आहिरे) तालुक्यातील शिरुड येथील श्री कालिका विद्या प्रसारक संस्था व युवाशक्ती फाउंडेशन नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिरुड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि २६ फेब्रुवारी रोजी एफ एम खंडेलवाल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात सकाळी १० वाजता होणाऱ्या या मेळाव्यात तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक कालिका विद्या प्रसारक संस्थेचे सचिव तसेच भाजयुमोचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशुतोष पाटील यांनी केले आहे. यावेळी अध्यक्ष गजानन नारायण पाटील व उपाध्यक्ष विजय गजानन पाटील उपस्थित राहणार आहेत. दहावी, बारावी, आर्ट्स, कॉमर्स व सायन्स ग्रॅज्युएट, आयटीआय व डिप्लोमा धारक तरुण या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी स्वप्निल पवार व सचिन बोरसे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.