कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची बैठक
मुंबई (गोपाल कोळी) येथील कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची मीटिंग कॉटन एक्सचेंजच्या मुख्य कार्यालयात कॉटन ग्रीन स्टेशन समोरील मुख्य ऑफिसमध्ये नुकतीच झाली.
कॉटन एक्सचेंज असोसिएशनच्या 21 सदस्यांपैकी 14 सदस्य हजर होते. त्यात महाराष्ट्रातर्फे उपस्थित असलेले ज्ञानेश्वर भामरे यांनी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणतारा यांच्यासमोर एक प्रस्ताव मागे मांडला की आपण शंभर वर्षापेक्षा सुद्धा जास्त आपल्या असोसिएशनला झालेले आहेत. परंतु आपण फक्त जिनिंग स्पिनिंग विविंग आणी ट्रेडींग यांच्यासाठीच काम करत आहोत परंतु ज्या कापूस पिकवणारे शेतकरी हा मुख्य केंद्रबिंदू असून सुद्धा आपण त्याच्याकडे आज पर्यंत आपण दुर्लक्षित केलेला आहे म्हणून माझी अशी मी विनंती केली आपल्या मार्फत शेतकऱ्यांना सहकार्य व्हावे त्यांच्या कापूस लागवडीपासूनच त्यांनी कापूस स्वच्छ कसा निर्माण करावा यासाठी व कापसाचे एकरी उत्पादनात वाढ व्हावी यासाठी आपण शेतकऱ्यांच्या पर्यंत दारापर्यंत जावे व प्रत्येक विभागामार्फत मीटिंग घ्यावी व शेतकऱ्यांना योग्य त्या कृषी विभागातल्या जाणकार लोकांकडून मार्गदर्शन मिळवून द्यावे त्यासाठी आपल्या असोसिएशन तर्फे खर्च करावा आणि फोरमेंटट्रेप असतील किंवा इतर प्रकारचे इतर प्रकारचे काही आपल्याला शेतकऱ्यांना मदत करता येईल त्याचा विचार करावा आणि त्याची सुरुवात खानदेश पासून आणि धुळे जिल्ह्यातून करावी अशी विनंती मी केली.
त्यास सुधिर मंत्री कॉटन ट्रेडर मुंबई त्यांनी तसेच रिंकू पांड्या एक्सपोर्ट यांनी अनुमोदन दिले व असोसिएशनच्या मीटिंगमध्ये एक मताने शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी खानदेशची निवड करून धुळे जिल्ह्यात प्रथम मेळावा घेण्याबाबत सर्वांचे एकमत झाले आणि कापूस लागवडीपूर्वी 15 मे च्या अगोदर धुळे येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे अशी माहिती कॉटन असोसिएशन इंडियाचे संचालक तथा केशरानंद जिनिंग चे एमडी ज्ञानेश्वर भामरे यांनी दिलेली आहे.