राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत तसेच विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत अनुदानाचे आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते वाटप
मोताळा (संभाजी गवळी) राष्ट्रीय कुटुंब सहायता योजना अंतर्गत मोताळा तालुक्यातील 47 लाभार्थ्यांना 9लक्ष 40,000 रुपयाचे निधीचे वाटप आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले मोताळा तहसील कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम आमदारांच्या उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की मागील काही वर्षापासून विशेष कुटुंब कल्याण सहायता योजनेअंतर्गत शासन दरबारी विधवा परिपक्व व निराधारांना शासनाकडून अनुदान दिल्या जाते. तालुक्यांमध्ये ज्यांना आधार नाही अशा जवळपास शेकडो कुटुंबांना सुद्धा एक हजार रुपयाचा महिना- दिला गेला यामध्ये राहिलेल्या कुटुंबांना सुद्धा समाविष्ट करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. शिवसेना कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी गावांमध्ये जाऊन याबाबतचे सर्वे करावे व सर्व कागदपत्र शिवसेना कार्यालय मोताळा येथे मोताळा तालुका संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ यांच्याकडे जमा करावे अशांना त्वरित मदत उपलब्ध करून द्यावी असे आदेश त्यांनी यावेळी दिले. तेव्हा तहसीलदार भगत, चव्हाण तसेच भोजराज पाटील, रावसाहेब देशमुख, कुवरसिंग मंगेश सावळे, भागवत पाटील, अनिल किरोचे, विनोद कोल्हे, गजानन चव्हाण, प्रकाश पांडे व तालुक्यातील सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी अल्पसंख्यांक सेना, वारकरी सेना, शिवसेना प्रणित शिवशक्ती-भीमशक्ती सेना, किसान सेनाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संजय गांधी निराधार समितीचे सर्व सदस्य व लाभार्थी उपस्थित होते.



