भुसावळ शहरात गावठी पिस्तूलसह जिवंत काडतूस पोलिसांनी केले हस्तगत
भुसावळ (ओमशंकर रायकवार) शहरात शिवपुर कन्हाळा रोड वरील घोडे पीर बाबा दर्गा परिसरात एक इसम गावठी पिस्टल व सह जिवंत काडतुस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठेच्या पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाल्यावरून त्वरित त्यांनी गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांना दालनात बोलावून माहिती देऊन घटनास्थळी रवाना केले व संशयित इसमाची अंगझडती घेतली असता आरोपिकडून एक गावठी पिस्टल सह जिवंत काडतुस हस्तगत केले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी पो.ना. निलेश बाबुलाल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. ०१ एप्रिल२०२२ रोजी भुसावळ शहरात शिवपुर कन्हाळा रोडवरील घोरडेपीर बाबा दर्गा परिसरात मझहर शकील कुरेशी वय २५ रा. मोतीराम नगर भुसावळ मधील इसम एक गावठी पिस्टल सह जिवंत काडतुस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठेच्या पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाल्यावरून त्यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना दालनात बोलावून माहिती दिली व घटनास्थळी रवाना करून सापळा रचला असता संशयित नामे मझहर शकील कुरेशी यांची दुपारी ०३.३० वाजेला अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जातुन एक गावठी पिस्टल व सह जिवंत काडतुसे मिळून आले म्हणून बाजारपेठ पोलिस स्टेशनला पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून आरोपी विरुद्ध गुरन २१०/२०२२ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) प्रमाणे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोहेकॉ विजय नेरकर, पोना निलेश चौधरी, उमाकांत पाटील,पोकॉ प्रशांत परदेशी सचिन चौधरी अशांनी मिळून केली गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर करीत आहे.