राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात एप्रिल फुल आंदोलन
वरणगाव (अखिलेशकुमार धिमान) आज १ एप्रिल चे औचित्य साधून मोदी सरकारचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. वरणगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने लोकांना लॉलीपॉप वाटप करून व फेकू नावाचा केक कापून मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
२०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी लोकांना महागाई किती आहे हे पटवून दिले ? आणि पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आम्ही स्वस्त दरात देऊ ! स्विस बँकेतील भ्रष्टाचाराचा पैसा भारतात आणून प्रत्येक व्यक्ती च्या खात्यावर १५ लाख रुपये टाकू असे जुमल्यांचे लॉलीपॉप लोकांना भाजपच्या वतीने देण्यात आले होते. मात्र आज सर्व या उलट झाले त्यामुळे आज लोकांना लॉलीपॉप देऊन मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील, जिल्हाउपाध्यक्ष वाय.आर.पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष दिपक मराठे, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, युवक जिल्हा सरचिटनिस अतुल चव्हाण, वरणगाव युवक शहराध्यक्ष सोहेल कुरेशी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.