भुसावळ येथील केन्द्रीय विद्यालयात “परीक्षा पर चर्चा २०२२” ‘परीक्षा की बात पीएम के साथ’ उपक्रमाचे थेट प्रक्षेपण
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) एका काळी शाळेत उन्हाळ्याची सुट्टी कधी लागतेय यावर विद्यार्थींचे लक्ष असायचे परंतू मागील दोन वर्ष कोरोना काळात विद्यार्थी गण घरी राहूनच आॅनलाईन शिक्षण घेत होते. शिक्षक वर्गांनेही आँनलाईन वर्ग घेण्यास खूप मेहनत घेतली व साली २०२२ शिक्षण मंत्रलयानुसार आॅफलाईन शाळा, काॅलेज ला परवानगी मिळाली.आणि विद्यार्थींमध्ये उत्साहाची लहर उमळली.सध्या सगळीकडे परीक्षेचं वातावरण आहे. परीक्षेसाठी विद्यार्थी मेहनत देखील घेतायेत.
अशातच विद्यार्थ्यांना परीक्षेचा कोणताही ताण येऊ नये, विद्यार्थ्यांनी तणावरहीत परीक्षेला सामोरं जावं, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधले. ‘परीक्षा पर चर्चा २०२२’ हा कार्यक्रम आज सकाळी ११:०० वा. नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परीक्षेच्या तयारीच्या पद्धती, तणावमुक्ती या सह विविध विषयांवर देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधले. त्या अनुषंगाने केन्द्रीय विद्यालय आॅ.फॅ भुसावळ येथील प्रभारी प्राचार्य नितिन कुमार उपाध्याय व मुख्याध्यापक सुरेश नरहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विविध ठिकाणी प्रोजेक्टर द्वारे विद्यार्थ्यांना “परीक्षा पर चर्चा” ह्या कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण दाखाविण्यात आला.
“परीक्षा की बात पीएम के साथ” या मोठ्या उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाचा उद्देश मुलांसाठी परीक्षेच्या वेळी तणामुक्त वातावरण निर्माण करणे आणि प्रत्येक मुलाच्या व्यक्तिमत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एकत्र आणणे हा आहे.अशी माहिती केन्द्रीय विद्यालय आॅ.फॅ.भुसावळ चे प्रभारी प्राचार्य यांनी प्रसिद्धि माध्यमांशी बोलतांना दिली. सदर प्रसंगी केन्द्रीय विद्यालय चे सर्व विद्यार्थ्यांनी ह्या उपक्रमाचा लाभ घेतला या वेळी शाळेतील शिक्षक सुरेश निनावे, गिरीष महाजन, दीपक सपकाळे, शिक्षिकि कु.संध्या परदेशी व इतर शिक्षकगण उपस्थित होते.