महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व पुरोगामी महिला मंच धुळे बैठक संपन्न
धुळे (प्रतिनिधी) महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व पुरोगामी महिला मंच धुळेची बैठक नुकतीच गुलाबराव वाघ (जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या निवासस्थानी भुपेश वाघ (जिल्हाध्यक्ष) व दिपा मोरे (जिल्हाध्यक्ष महिला मंच) यांच्या अध्यक्षतेखाली व रुखमा पाटील (राज्य महिला कोषाध्यक्षा), प्रभाकर चौधरी (विभागीय अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
बैठकीची सुरुवात दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. त्यानंतर शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व ते प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेने प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करावा असा निर्णय घेतला गेला.
१) निवड श्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी च्या प्रलंबित प्रश्न
२) केंद्रप्रमुख व शि.वि.अधिकारी रिक्त पद अभावितपणे करणेबाबत पाठपुरावा
३) केंद्रप्रमुख, पदोन्नती मुख्याध्यापक, विषय शिक्षक यांची रिक्त पदे भरणे बाबत पाठपुरावा
४)विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणेबाबत
५) संचमान्यता करणेबाबत
६) प्रलंबित वैद्यकीय बिलाचा पाठपुरावा
७) शाळांचे थकित विजबील ग्रामपंचायत यांनी भरणे बाबत
८) भविष्य निर्वाह निधी च्या प्रकरणांचा पाठपुरावा करणेबाबत
यासह अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली व त्या मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला जाणार आहे.
यावेळी आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही संघटनेचा महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करणेविषयी ठरविण्यात आले. संघटनेचे महिला कोषाध्यक्षा मा.सौ.रुखमा पाटील मॅडम, जिल्हा उपाध्यक्षा मा.श्रीमती वैशाली बच्छाव मॅडम यांना निसर्ग मित्र समितीच्या पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच तालुका कार्याध्यक्षा जयश्री ब़ोरसे यांना एम एड्.परिक्षेत ९३%गूण मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बैठकीचे सुत्रसंचलन सरचिटणीस ऋषिकेश कापडे यांनी केले प्रास्ताविक कोषाध्यक्ष न्हानू माळी व आभार प्रदर्शन महानगर कार्याध्यक्ष डॉ. आशुतोष वसईकर यांनी केले.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस ऋषिकेश कापडे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, कोषाध्यक्ष न्हानू माळी, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ कैलाश सोनवणे, महिला सरचिटणीस प्रतिभा उपाध्यक्ष संगिता ठाकरे, उपाध्यक्ष वैशाली बच्छाव, वाघ, तालुका अध्यक्षा सुमन साळुंके, ता.सरचिटणिस भारती भदाणे, कार्याध्यक्ष जयश्री बोरसे, कोषाध्यक्ष प्रणाली पाटील, संघटक वैशाली वाघ, हिरा अहिरे, तालुका अध्यक्ष हनुमानदास बैरागी, तालुका सरचिटणीस डॉ. भागवत चौधरी, जिल्हा संघटक खुशाल चित्ते, संजय ठाकूर युवराज महाले, महानगर सरचिटणीस ललित वाघ, कार्याध्यक्ष डॉ. आशुतोष वसईकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.