मल्ल गोविंदा लंगोटे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील बालवीर चौक परिसरात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे रविवारी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाने अभिवादन करण्यात आले.
हिंदुरुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस चाळीसगाव येथील गवळी समाजाचे युवा नेतृत्व तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पात्र ठरलेले पहिलवान गोविंदा रमेश लंगोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस राजेंद्र सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण केले. संयुक्त प्रतिमापूजन कार्यक्रमास शहीद शिरीषकुमार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, सदस्य. प्रा. एकनाथ हिरणवाळे, गोपाळ गवळी, सोमेश गवळी, महादूु गोडळकर, विशाल हिरणवाळे, यशवंत कासार, चुडामण पाटील, पार्थ कमलेश कासार, आदी उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेऊन नियमित मास्क वापरावे आणि लसीकरण करून घेण्याचे आवाहन शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे करण्यात आले.