महाराष्ट्र
सोयगाव येथे स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची पुण्यतिथी साजरी
सोयगाव (प्रतिनिधी) शहरातील वार्ड क्रमांक १४ येथे स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते सावरकर स्मारकावर पूष्पहार घालून मानवंदना दिली व वंदे मातरम वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. यावेळी अजय नेरपगारे, भास्कर श्रीखंडे, योगेश बोखारे, मगन शिरसाठ, नंदू मडवे, कडूबा मिसाळ, शिवाजी ईंगळे, गणेश मानकर, सुनील काकडे, अजय पाटील, गोपीनाथ एंडोले, संतोष कूऱ्राडे, भारत हिरे आदींसह नांगरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.