निष्क्रीय आमदाराचा खोटारडेपणा
मालपुर (गोपाल कोळी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप दादा बेडसे यांनी ऑक्टोंबर २०२० मध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघांतर्गत शिंदखेडा तालुक्यातील ५ आणि साक्री तालुक्यातील ४ मुख्य रस्त्यांवरील पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन दिले होते. तसेच या कामासाठी निधी उपलब्ध होऊन प्रशासकीय मान्यता प्राप्त होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा देखील केला. सदरील निवेदनाची व पाठपुराव्याची दखल घेत त्वरीत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रारीत केले व मार्च २०२१ मध्ये सदरील कामांसाठी २१ कोटींचा निधी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर केला.
सदरील विकासकामासाठी कोणताही पाठपुरावा न करता, कोणताही निधी मंजूर न करता तालुक्याचे निष्क्रीय आमदार जयकुमार रावल हे उद्घाटन करून विकासकामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस शिंदखेडा तालुकातर्फे जाहीर निषेध करीत आहोत. जयकुमार रावल हे निष्क्रीय आमदार असून दूसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा वारंवार प्रयत्न करीत असतात हे संपूर्ण तालुका कायम बघत आलेला आहे. दूसऱ्या पक्षातील नेते, लोकप्रतिनिधींच्या तर सोडाच परंतु स्वतःच्या पक्षातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींच्या देखील विकासकामांचे श्रेय लाटून रावल हे प्रकाशझोतात येण्यासाठी व स्वतःचा निष्क्रीयपणा लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसून आलेले संपूर्ण मतदारसंघातील जनता जाणून आहे, असं शिंदखेडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष डॉ कैलास ठाकरे म्हणाले.



