तळणी ते हनुमान नगर रस्त्याच्या कामात भ्रष्ट्राचार ; मिलींद बोदडे यांचे ठिय्या आंदोलन
बुलढाणा (प्रतिनिधी) तळणी ग्रामपंचायत अतंर्गत येणाऱ्या आमदार विकास निधी २५१५ मधुन तळणी ते हनुमान नगर जोड रस्ता मंजुर झाला आहे. त्या रस्यांचे काम पुर्ण होऊन दोन दिवस झाले असता दोन दिवसात रस्तात खड्डे पडले आहेत. ते काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे काम झाले असून त्या कामात शाखा अभियंता व ठेकेदार यांनी संगतमाताने रस्त्याच्या कामात भ्रष्ट्राचार केला आहे. या कामाची त्वरीत उच्च स्तरीय शासन समिती नेमुन या कामाची चौकशी करुन दोषीवर कार्यवाही करण्यात यावी, त्यासाठी मिलींद बोदडे यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन चालु केलं आहे.
त्याप्रसंगी सरपंच पती शेषराव बोदडे, उपसरपंच पती प्रविण नारखेडे, मंगेश नारखेडे, ग्रामसेवक डुकरे, उध्दव नाफडे, दिपा झोपे, अविनाश गायकवाड, प्रशांत बोदडे, कृिष्णा चव्हाण, ज्ञानेश्वर तायडे, रामभाऊ इंगळे, किष्ण्रा निशानकर, ओकांर तायडे, गणेश वाघ, देशोन्नतीचे वार्ताहार, ग्रामपंचायत शिपाई प्रविण चोपडे, व गावातील बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित होती.