मराठी राजभाषा दिन महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पहुर येथे साजरा
जामनेर (अमोल बावस्कर) मराठी राजभाषा दिनानिमित्त महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात, पहुर उत्सव माय मराठीचा हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि मराठी संस्कृतीचं दर्शन विद्यार्थ्यांना घडावं या उद्देशाने आयोजित केलेल्या या उत्सवात मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या कीर्तन, वही गायन, लावणी, लोकगीत, लोककला, समुह नृत्य, लोक नृत्य, गवळण, पोवाडा, नाटीका, सजीव देखावे असे सुमारे ५७ बहारदार कलाविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केलेत. या कार्यक्रमाचे उद्धघाटन शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष बाबुरावजी अण्णा घोंगडेव इतर संचालक मंडळ यांनी प्रतिमा पूजन करून केले. संस्थेचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला दाद देत मुलांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम पाटील, सचिव भगवान अण्णा घोंगडे, कोषाध्यक्ष शंकर घोंगडे, संचालक ज्ञानेश्वर लहासे, संचालक अशोक बनकर, संचालिका वंदनाताई वानखेडे, सरपंच आशाताई जाधव, माजी सरपंच शंकर जाधव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस .एस. गावंडे, केंद्रप्रमुख भानुदास तायडे, क्षत्रिय माळी समाज संघटनेचे सचिव दिपक जाधव, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्रावण घोंगडे, अपंग संघटनेच्या जामनेर तालुका अध्यक्षा वैशाली गव्हाळे, तुकाराम जाधव, जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा पहुर कसबे येथील उपक्रमशील शिक्षिका किर्ती ताई घोंगडे, आर.टी. लेले हायस्कूलचे मराठी विषय शिक्षक आर.टी. देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे बळीराम जाधव, तुषार बनकर, चित्रपट निर्माता जीवन लहासे यांच्यासह पालक बंधू-भगिनी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित दिली. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती घोंगडे, उत्सव माय मराठीचा या उपक्रम समितीच्या प्रमुख बनकर, बारी, जाधव, भामरे, राऊत, पाटील, वानखेडे, सागर, सोनवणे, दिपक पाटील, चौधरी, अमोल बावस्कर, किरण पाटील, तडवी, प्रकाश जोशी, सुनील पवार, संजय यांच्यासह सर्व शिक्षक बंधू भगिनीं यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बनकर यांनी तर आभार जाधव यांनी केले.