शिंदखेडा येथील कनिष्ठ महाविदयालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नाटिका संपन्न
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील एम.एच. एस.एस कनिष्ठ महाविदयालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विज्ञान शिक्षक व मुख्याध्यापक प्रा.दिपक माळी होते. हयावेळी ” झांसाराम बाबांचा भांडाफोड ” ही चमत्कार सादरीकरण करीत विद्यार्थीनी नाटिका सादर केली.
यावेळी मंत्रातुन अग्नी प्रज्वलित करणे. रिकाम्या हातातुन सोन्याची अंगठी काढणे.नारळातुन करणी करणे. हे चमत्काराचे प्रयोग सादर केले. यात चमत्कारा मागिल विज्ञान व हातचलाखी याचे स्पष्टीकरण देण्यात आले. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अंनिस चे कार्यकर्ते प्रा.परेश शहा व प्रा.संदिप गिरासे यांनी केले. या नाटिकेत दिपक पवार, अमन गुप्ता, आकाश गुप्ता, जयेश परदेशी, राज सोनवणे, गौरव पाटील, दिपक भील या विद्यार्थीनी भुमिका निभावली. सुत्रसंचलन रोशनी भोई या विद्यार्थी नीने केले. यानंतर अध्यक्षीय मनोगतातून प्रा.दिपक माळी यांनी विज्ञान विचारसरणीचा अवलंब करून चिकित्सक दृष्टी जोपासण्याचे आवाहन केले. प्राचार्य ए.वाय.बोरसे व प्रा.पी.टी.पाटील सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



