उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघास पुरस्काराचे वितरण
सिल्लोड (प्रतिनिधी) येथील SPL क्रिकेट सामन्यांतील विजेत्यांना युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते पुरस्कार व बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रथम विजेत्या संघास राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने 1 लाख रुपये रोख व स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले.
शहरातील महाराणा प्रताप चौक भागातील ‘काटा’ लगत मैदानात हे सामने संपन्न झाले. नॅशनल क्रिकेट क्लब च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना अली सिसी व शीतल मेडिकल यांच्यात झाला. यात अली सीसी संघाने जोरदार फलंदाजी करत विजय मिळवला.
खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी सिल्लोड नगर परिषद तसेच महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. सिल्लोड व परिसरातील खेळाडूंना कायमची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याने सिल्लोड येथे लवकरच अत्याधुनिक क्रीडांगण उभारण्यात येणार असून यासाठी शासनाने तत्वतः मंजुरी दिली असल्याची माहिती उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी यावेळी दिली. या क्रीडांगणाचा सिल्लोड व परिसरातील खेळाडूंना निश्चितपणे लाभ होईल असे अब्दुल समीर यांनी स्पष्ट केले.
या पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, हनीफ मुलतानी, नगरसेवक मनोज झवर, मतीन देशमुख, रईस मुजावर, अनिस कुरेशी ,बबलू पठाण, आशिष कुलकर्णी , फहीम पठाण, स्वप्नील शेळके, शेख आफताब, काझी अब्दुल वाहिद, मोईज शेख , नॅशनल क्रिकेट क्लबचे इकबाल पाशा, अब्दुल हमीद, इकबाल, राजू काकडे, फयाझ खान, अफरोज खान, झाकीर हुसेन आदींची उपस्थिती होती.